जळगाव जिल्हा

Jalgaon : रस्त्याच्या कामावरून बोलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याला नगरसेवकाकडून धमकी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२३ । जळगाव मनपाची मुदत लवकरच संपत असून राजकीय वारे वाहू लागले आहे. परिसरातील रस्त्यांविषयी सोशल मीडियावर व्यक्त झाल्याचा राग आल्याने विद्यमान नगरसेवक ईबा पटेल यांनी धमकी दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते साहिल पटेल यांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार केली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

sahil khan jpg webp

जळगाव शहरातील सालार नगरात राहणारे साहिल मुशीर पटेल हे एक सामाजिक कार्यकर्ते असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य देखील आहेत. नुकतेच त्यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला असून आगामी मनपा निवडणुकीत ते नगरसेवक पदाचे दावेदार आहेत. दि.२० ऑगस्ट रोजी सायंकाळी महेरून नं.१ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर एका व्यक्तीने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे फोटो पाठविले. साहिल पटेल यांनी त्यावर उत्तर देत कुणाचेही नाव न घेता ‘शाहिद मेंबर साहब, हमारी ऐसी किस्मत कहा के हम अच्छे रस्ते देखे’ अशी कमेंट पोस्ट केली.

कुणी एका व्यक्तीला उद्देशून बोलले नसताना देखील नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी कल देखते अशी तर त्यांचे भाऊ इस्माईल पटेल यांनी ‘तू पर्सनल मत जा नही तो महेंगा पडेगा’ अशा भाषेत धमकावले. साहिल पटेल यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली असून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. माझ्या जिविताला नगरसेवक ईबा पटेल यांच्या आणि कुटुंबापासून धोका, माझे काही बरे वाईट झाल्यास ते जबाबदार असतील, अशा आशयाचे निवेदन गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, पोलीस अधीक्षक यांना दिले असल्याची माहिती साहिल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button