संभाजी राजेंच्या उपोषणाला मुक्ताईनगर शिवसेनेचा पाठींबा

फेब्रुवारी 28, 2022 3:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मी स्वत: व शिवसेना मुक्ताईनगर संभाजी राजे यांना पाठींबा देत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत येथील तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन देण्यात आले.

nivedan 6 jpg webp

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब मराठ्यांना ओबीसी प्रमाणेच सवलती द्याव्या, अशी मागणी करत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेत आझाद मैदानावर लाक्षणिक आमरण उपोषणाला बसले. असुन छत्रपतींच्या उपोषणाला मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार श्वेता संचेती यांना दिलेल्या लेखी पत्राद्वारे पठींबा दिला आहे. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अद्यापही मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने मार्गी लावलेला नाही. अनेकदा चर्चा करुनही मार्ग निघत नसल्याने खासदार संभाजीराजे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी २६ रोजी पासुन आझाद मैदानावर सुरुवात केली असुन त्यांची प्रकृती खालावली आहे. तसेच औषधी नाकारत असल्याचे समोर आले आहे.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील, जिवराम कोळी, शहरप्रमुख गणेश टोंगे, अल्पसंख्यांक संघटक अफसर खान, दिलीप पाटील, ललीत बाविस्कर, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, सुभाष पाटील, नगरसेवक संतोष कोळी, पियुष महाजन, निलेश सिरसाठ, संतोष मराठे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now