चोरीच्या दुचाकींसह चौघे चोरट्यांच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

ऑगस्ट 17, 2023 5:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरासह परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून वाहनधारक धास्तावले आहे. एकंदरीत चोरट्यांना खाकीचा धाकच राहिलेला नाहीय. अशातच दुचाकी लांबविणाऱ्या चौघांच्या एमआयडीसी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी व शाळेतून चोरी गेलेले साहित्य हस्तगत केला असून याबात एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chori shirsoli jpg webp

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील भरत गंगाराम बारी (वय-४३) यांची घरासमोरून २१ मे रोजी दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएल ३०३२) ही चोरट्यांनी लांबविली होती. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही दुचाकी चार जणांनी चोरून नेल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने बुधवारी रात्री कारवाई करत चौघे चोरट्यांना अटक केली

अजय विजय भिल, किरण गोपाळ भिल, मयुर किशोर बारी आणि सौरव राजू सोनवणे सर्व रा. शिरसोली ता.जि.जळगाव असं अटक केलेल्या यांना अटक केली. त्यांनी चोरीच्या दोन दुचाकी आणि शिरसोली शाळेतील चोरून नेलेले साहित्य काढून दिले. याप्रकरणी चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पोहेकॉ अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, सचिन पाटील, पो.कॉ. छगन तायडे, किरण पाटील, विशाल कोळी, राहूल रगडे यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now