गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार माझ्या विकासकामांची कॉपी करतात, आमदारानं आपल्याच मंत्र्यांचा काढला चिमटा

ऑगस्ट 17, 2023 5:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२३ । नुकतेच पावसाळी अधिवेशन पार पडले असून यावेळी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे गटासह आपल्या गटातील आमदारांवर निधीचा पाऊस केला. यादरम्यान, विकासकामांवरून शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आपल्याच गटातील मंत्र्यांसह भाजप आमदारांवर खोचक टीका केली आहे.

gulabrao patil abdul sattar jpg webp

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?
आमदार गायकवाड यांनी मंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) , अमरावतीचे आमदार, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, जळगाव जामोद, चिखली भाजपचे आमदार हे माझ्या विकासकामांची कॉपी करतात असं ते म्हणाले आले. तसेच कॉपी करून कोणी पास होत नसतं असा चिमटाही त्यांनी आपल्याच मंत्र्यांचा काढला आहे.

मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष प्रवेश सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार संजय गायकवाड आपल्याच पक्षातील मंत्र्यांवर खोचक टीका केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now