रेल्वेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन

ऑगस्ट 16, 2023 1:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२३ । रेल्वे गाडीचा धक्क्याने जखमी होउन महिलेचा मृत्यू झाला. याबाबत अनोळखी महिलेचे ओळख पटण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

crime 5 jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून म्हसावद मेन लाईन के एम ३९९/१२A. जवळ एक अनोळखी महिलेचा कोणत्यातरी रेल्वेच्या धक्क्याने मृत अवस्थेत आढळली घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेतले असता सदर महिला मृत अवस्थेत आढळली पाहणी केली असता अनोळखी असल्याचे समजले.

मृत अनोळखी महिलेचे वर्णन सदर महिलेचे अंदाजित वय ४०/४५, उंची ५ फूट रंग सावळा, डोक्यावरील केस लांब काळे, नाकात पिवळ्या रंगाची धातूची नथनी, अंगावर निळसर रंगाचे ब्लाऊज, अंगावर लाल, निळे, काळे रंगाची चॉकलेटी साडी, मृतू महिलेकडे पैसा अडका, तिकीट काही मिळाले नसून मरणोत्तर घटनेची नोंद जळगाव लोहमार्ग पोलिसात करण्यात आलेली आहे. शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णाला दाखल करण्यात आलेला आहे. सदरील महिला अनोळखी असून ओळख पटविण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांनी केले आहे घटनेचा पुढील तपास पो.ना नरेंद्र चौधरी करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now