---Advertisement---
मुक्ताईनगर गुन्हे

भरधाव कंटेनरने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला उडविले.. मुक्ताईनगरातील घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले असून याच दरम्यान, कंटेनरच्या धडकेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मुक्ताईनगर शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर घडली. जितेंद्र रवींद्र वाघ (वय ३०, रा. चिखली) असं मृत तरुण कर्मचाऱ्याचे नाव आहे.

accident 34 jpg webp

मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली-घोडसगाव ग्रामपंचायतीमध्ये जितेंद्र वाघ हे पाणी पुरवठा शिपाई म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते मुक्ताईनगरकडून आपल्या गावाकडे निघाले असतांना खडसे फार्म हाऊसच्या समोरच्या उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

---Advertisement---

दरम्यान, अपघातानंतर कंटेनरने चालकाने वाहनासह घटनास्थळावून पलायन केल्याचे वृत्त असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---