जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ जुलै २०२३ | जळगाव जिल्ह्यातील स्टार्टअप इकोसिस्टीमला बळकटी मिळावी तसेच जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आयोजित जळगाव स्टार्टअप मीट उत्साहात पार पडली. जळगाव स्टार्टअप गृपचे अजिंक्य तोतला यांच्या पुढाकाराने हॉटेल सिल्वर पॅलेसमध्ये या स्टार्टअप मीटचे आयोजन करण्यात आले होते. या स्टार्टअप मीटमध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ सहभागी झाले होते.
स्टार्टअप वाढीला आणि विकासाला चालना देण्यासाठी सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्याबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी सहभागी तरुणांकडील स्टार्टअप आयडीया समजून घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या स्टार्टअप मीटला अमित लढ्ढा (Teacher Factory – Edutech Platform), निखिल कोठारी (Investor), आर्यन मनियार (Contech), अमन शर्मा (Construction), महेश भोकारीकर (Law firm), पंकज दारा (CA), हरक सोनी (Millet Food), आशुतोष रंगा (Logic point infotech – cyber security), हितेंद्र वाल्हे (AI/ML & Robotics), हर्ष गुरु (AI/ML & Robotics), अजिंक्य तोतला (Aggregator Model), योगेश चौधरी (Agriculture), संजय लढे (Pharmaceutical Consultancy), यश हेडा (Electrical, solar), मोहित गोयल (Home Decor), अमर सिधवानी (Medicine), भारत दारा (Retail), निखिल जाधव, अंकुर साळुंखे, सीए पंकज दारा उपस्थित होते.
KCIIL-Incubation center चे डायरेक्टर भूषण चौधरी यांनी इनक्युबेशन सेंटर बद्दल सविस्तर माहिती दिली. अमित लढ्ढा, भारत दारा, हितेंद्र वाल्हे, हर्ष गुरु यांनी त्यांच्या स्टार्टअपची संकल्पनांचे सादरीकरण केले. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्रित यावे आणि startup ecosystem च्या
विकासासाठी आपले योगदान द्यावे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.