Jalgaon : चोरीच्या 5 दुचाकीसह आणखी एक चोरटा पोलिसांच्या जाळ्यात..

जुलै 17, 2023 5:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । दुचाकी चोरी करणाऱ्या आणखी एका संशयीत चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी एरंडोल येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून चंद्रकांत रामदास साळुंखे (वय-४२) रा. हिराशिवा कॉलनी, जळगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

duchaki chor jpg webp

जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या असून दिवसेंदिवस या घटना वाढत असल्याचे दिसून आले. याच दरम्यान जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा शोधा घेत असतांना चंद्रकांत साळुंखे हाच दुचाकींची चोरी करत असल्याचे समोर आले. जिलहापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे याची माहिती मिळाली.

त्यानंतर अधिक माहिती मिळविली असतांना संशयित आरोपी हा एरंडोल शहरात असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने संशयित आरोपी चंद्रकांत साळुंखे याला एरंडोल शहरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now