आता काँग्रेसचे आमदारही फुटणार – मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । येत्या काळात काँग्रेसचे आमदारही फुटणार असल्याचे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. आधी शिवसेना मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अश्यातच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानाने एकच खळबळ उडवली आहे.
य़ावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नीलम गोऱ्हे यांना खरंतर प्रवेश करण्याची नव्हती. दाल में कुछ काला है म्हणुनच त्या आमच्या बरोबर आल्या. मी तर ऐकलं आहे की काँग्रेसचे आमदारही तयारीत आहेत.
“गेल्यावेळी मी नगर येथील सभेत सांगितलं होत की, विखे पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढेल. त्याप्रमाणे ते भाजपकडून निवडणूक लढले. त्यांनतर मी दोन महिन्यापासून सांगत होतो की, अजित पवार आपल्याकडे येतील ते आले, असे पाटील म्हणाले. आता काँग्रेसवाले येतील ते पण बघा”, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.