सोने पुन्हा महागले, चांदी 71 हजारांच्या पुढे, नवीन दर पहा..

जुलै 7, 2023 9:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२३ । भारतीय सराफा बाजारात चढ-उतारचा काळ सुरु आहे. कधी सोने-चांदी महाग तर कधी स्वस्त होताना दिसत असून यामुळे ग्राहकही संभ्रमात आहे. मार्च-एप्रिलमध्ये सोने आणि चांदीच्या किमतीने रेकॉर्ड केला होता. मात्र मे पासून सोने-चांदीची घसरगुंडी सुरु असून आता सोने 59,000 रुपयांच्या पण खाली उतरते आहे. Gold Silver Rate Today

Gold jpg webp

जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने विनाजीएसटी 54,000 रुपयांवर आहे. तर 24 कॅरेट दहा ग्रॅम सोने विनाजीएसटी 58,850 रुपयांवर आहे. दुसरीकडे एक किलो चांदीचे दरही वाढले असून आता 71,500 रुपयांना विकले जात आहेत.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील आजचा दर?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, आज शुक्रवारी सकाळी सुरु होताच सोने 36 रुपयांनी घसरून 58,365 रुपये प्रति 10 ग्रॅम दरावर व्यवहार करत आहे. सोबतच चांदीचा दर 104 रुपयांनी घसरून 70,220 प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now