मंत्रीपदाच्या पाठोपाठ अनिल पाटलांकडे सोपविली ‘या’ पदाची जबाबदारी

जुलै 3, 2023 2:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२३ । राज्याच्या राजकारणात रविवारी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. अजित पवार (Ajit Pawar) बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील (Anil Patil) यांचा समावेश आहे. मंत्रिपदाच्या पाठोपाठ अजित पवारांनी अनिल पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा प्रतोद पदाची जबाबदारी सोपविली आहे.

MAL Anil Patil jpg webp

आमदार अनिल पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीने प्रतोदपदाची जबाबदारी सोपविली होती. ते अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक असून २०१९ साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीच्या कालावधीत देखील ते दादांसोबतच होते. याचेच फळ म्हणून महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाने प्रतोदपद सोपविले होते.

कालच मंत्रीपदाची शपथ घेतलेले ना. अनिल भाईदास पाटील यांच्याकडे अजित पवार यांनी पुन्हा एकदा प्रतोद पदाची जबाबदारी सोपविली आहे. कोणत्याही पक्षासाठी प्रतोद हे पद अतिशय महत्वाचे असते. पक्षाच्या वतीने व्हिप काढण्याची जबाबदारी ही संबंधीत प्रतोद यांच्याकडेच असते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now