येत्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार ! – संजय राऊत
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जणांची ही सुरुवात आहे. असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, 160 हून अधिक आमदार स्वतः सोबत असतानाही भारतीय जनता पक्षाला अजित पवार यांना सोबत घ्यावा लागला. याचा अर्थ शिंदे फडणवीस सरकार हे अस्थिर आहे. म्हणून त्यांना अजित पवार यांची साथ सोबत घ्यावी लागली आहे.
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाण्याची ही सुरुवात आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जास्त काळ राहणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबतच्या आमदारांचे चेहरे पाहाल तर तुम्हाला त्यांची वेदना समजेल. असे यावेळी संजय राऊत म्हणाले.
अजित पवार भविष्यात जाणार होते ते आता गेले असेही संजय राऊत म्हणाले व जनतेला हे मान्य नसल्याचेही ते म्हणाले.
अजित पवार भाजप सोबत जाणार याची मला पक्की माहिती असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यासाठीच मी दीड महिन्यापूर्वी सामनातून माझी भूमिका मांडली होती. जी आज खरी ठरत आहे आणि येत्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार हे देखील माझ्या भाकीत खरं ठरणार आहे असे संजय राऊत म्हणाले.