यावल येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

मे 16, 2021 8:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । यावल शहरातील सिध्दार्थनगर परिसरातील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुपारी घडली. रामकृष्ण रमेश गजरे (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

crime

यावल शहरातील सिद्धार्थनगर या परिसरात राहणारे रामकृष्ण गजरे हे मजुरीच्या पैशांतून आपला उदरनिवार्ह करीत होते. दरम्यान, आज त्यांनी  २ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील परिसरात खाटेवरच खाटेच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत रामकृष्ण रमेश गजरे यांचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. रामकृष्ण गजरे यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी, चार मुली, जावई-नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now