सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी..! ‘क्लार्क’ पदाच्या तब्बल 4000+ जागांसाठी मेगाभरती

जुलै 1, 2023 2:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर सरकारी बँकेत नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मार्फत विविध सरकारी बँकांमध्ये क्लार्क पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. तब्बल 4045+ जागांसाठी ही भरती होणार आहे. IBPS Clerk Bharti 2023

ibps clerk bhrti jpg webp

पदवी पास उमेदवारांना नोकरीची ही मोठी संधी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 आहे. इच्छुक असलेले उमेदवार www.ibps.in वेबसाईटवरून जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अशी होईल निवड प्रक्रिया : अर्जदारांनी दोन फेऱ्या म्हणजे प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्यास त्यांना निवडले जाईल.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता:
अर्जदाराने भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फी : General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now