⁠ 
शनिवार, मे 18, 2024

आदर्श गाव : जिल्ह्यातील ‘या’ गावात बकरी ईद व आषाढी एकादशी एकत्र आल्याने कुर्बानी दिली जाणार नाही

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२३ ।  आषाढी एकादशी व बकरी ईद यंदा एकाच दिवशी येत आहेत. अशावेळी या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एका गावातील मुस्लिम समाज बांधवांनी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यातील कुरह्या या गावामध्ये प्रति पंढरपूर साकारण्यात येत. सरपंच डॉ.बी.सी.महाजन हे प्रति पंढरपूर साकारतात. याची आरास पाहण्यासाठी हजारो विठ्ठल भक्त देवदर्शनासाठी या ठिकाणी येतात. याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मुसलमान बांधवही सहभागी होत असतात.

दरम्यान यंदा आषाढी एकादशी आणि बकरी एकत्र आल्याने आषाढी एकादशीचे पावित्र्य राखून बकरी ईदच्या दिवशी कोणतीही कुर्बानी देण्यात येणार नसल्याने गावकऱ्यांनी ठरवले आहे. यंदाची कुर्बानी ही रद्द केली आहे.

या गावातील सर्वच नागरिकांनी घेतलेल्या समजूतदार भूमिकेचं संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होत असून सर्वांनी यांचा आदर्श घ्यावा असे म्हटले जात आहे.