जळगाव शहरराजकारण

जळगाव शहरातील मुलभूत सोयीसुविधांसाठी ९ कोटींचा निधी मंजूर; आमदार राजुमामांच्या प्रयत्नांना यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२३ । “महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास” योजनेंतर्गत नऊ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ही जळगाव शहरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब असून यामध्ये शहरातील विविध विकास कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.

खासदार उन्मेष पाटील व जळगाव शहराचे आमदार सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांच्या विशेष प्रयत्नांनी सदरचा निधी प्राप्त झाला असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

जळगाव शहरास शिंदे व फडणवीस सरकार आल्यापासून भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे संपूर्ण जळगाव शहर वासीयांच्या वतीने आमदार राजुमामा भोळे यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Back to top button