जळगाव जिल्हाराजकारण
राऊतांसाठी ठाण्याच्या मनोरुग्णालयात बेड वाढवले आहेत !
जळगाव लाईव्ह न्यूज : ४ जून २०२३ : संजय राऊत यांची संस्कृती किती खालच्या दर्ज्याची आहे हे राऊत यांच्या टिके वरुन समजत आहे. राऊत यांचं डोकं फिरलं आहे. त्यांच्यासाठी ठाण्याच्या मनोरुग्णालयात बेड वाढवले आहेत. अशी टिका मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदें यांच्या प्रश्नावर थुंकलं होतं. या कृत्यामुळे राज्याचं राजकारण तापल आहे. राऊत यांच्या थुंकल्याच्या प्रकारावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात आपली प्रतिक्रीया दिली आहे.
ज्या ४१ आमदारांनी संजय राऊत यांना मतदान करून राज्यसभेवर पाठवले. त्यांच्या मुलाच्या नावावर हे थुंकताहेत. त्यामुळे संजय राऊत यांना थोडी जरी लाज शरम असेल, तर त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा; अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली.