मान्सूनचीआतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! काय आहे हवामान खात्याचा अंदाज

मे 25, 2023 1:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । राज्यासह देशभरात सध्या घाम काढणाऱ्या उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आता मान्सूनचीआतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढील दोन दिवसात मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानविभागाने याबाबतची माहिती दिली आहे.अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यात लवकरच मान्सूनचे संकेत मिळाले आहेत.

rain 2 jpg webp

कोकणात दोन दिवसांत म्हणजेच 27 मेपर्यंत मान्सूनपूर्व पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. यामुळे राज्यात सात जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून 7 जूनपर्यंत पोहोचणार आहे.

मान्सून उशिरा दाखल होण्याच हे आहे कारण?
विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल.

हे वादळ मान्सूनला रोखणारे आहे, असा स्कायमेटचा अंदाज आहे. परंतु भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे प्रगती अशीच राहिल्यास केरळमध्ये 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो आणि यामुळे राज्यातही 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल.

मान्सूनबाबत सकारात्मक बातमी समोर आलेली असतानाच आता एक काळजी वाढवणारी बातमीही समोर आली आहे. यंदाच्या मान्सूनवर ‘अल निनो’चा प्रभाव असेल असा इशारा IMD कडून देण्यात आला आहे. ज्यामुळं यंदाच्या वर्षी सामान्य असणारा मान्सून त्यापेक्षाही कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now