अभ्यासक्रमात होणार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा समावेश !
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२३ । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार असल्याचं वक्तव्य राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे.
तसेच येत्या २८ मे रोजी सावकारांची १४० वी जयंती आहे. हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन’ साजरा करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्याच दिवशी देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण होणार आहे, असं राज्यपाल रमेश बैस म्हणाले.वीर सावरकरांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे स्मारक देशासाठी प्रेरणास्थान बनायला पाहीजे असे राज्यपाल म्हणाले आहेत.
वीर सावरक स्वातंत्र चळवळीतील महान नायक होते. ते विद्वान आणि दार्शनिक होते. दोनदा आजीवान कारावासाची शिक्षा मिळालेले ते एकमेव स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे विचार कालजयी होते. सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग आहे ते सामाजिक विकृतीच्या विरोधात लढणारे योद्धा होते. ते थोर समाज सुधारक होतो. ते जातीवादाच्या विरोधात आहे. जाती या देशासाठी कलंक असल्याचं ते सांगायचे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सावरकरांचे स्वप्न साकारण्यात येणार आहे. राजभवनात वीर सावरकरांवर गॅलरी तयार करण्यात आली आहे, असंही राज्यपाल म्हणाले.