खळबळजनक बातमी : विहिरीत सापडला बेपत्ता जवानाचा मृतदेह
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । बुलढाणा जिल्ह्यातील शिरपूर येथील बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह मुक्ताईनगर येथे शहरा जवळच असलेल्या आढळला आहे. यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. संदीप शिवाजी शेळके (25, शिरपूर, ता.जि.बुलढाणा) असे मयत जवानाचे नाव आहे.
भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला संदीप शेळके हा जवान मित्राला सोडण्यासाठी शनिवार, 13 रोजी चिखली येथे आला होता व नंतर जेवणासाठी हॉटेल भाग्यश्रीत गेल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला मात्र जवानाचा तपास न लागल्याने मुक्ताईनगर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली
मात्र सोमवार, 15 मे रोजी सासंकाळी या जवानाचा मृतदेह चिखली शिवारातीलच एका विहीरीत आढळल्याने शहरात खळबळ उडाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू व सहकार्यांनी भेट देत पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. जवानाचा नेमका मृत्यू कसा झाला ? या कारणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.