महाराष्ट्र

अनधिकृतपणे झाड तोडत असाल तर सावधान : जिल्ह्यात या ठिकाणी दाखल झाला गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२३ ।  झाड तोडले तर गुन्हा दाखल होतो असे आपण फक्त ऐकले होते. मात्र प्रत्येक्षात तो दाखल होत नाही असाच समज नागरिकांचा आहे. अश्यावेळी जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी मार्गावर देवळी आणि गोगडी पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिरा समोर असलेले झाड अज्ञात व्यक्तींनी कुऱ्हाडीचे घाव घालून तोडल्याची घटना उघडकीस आली

श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर असलेले शिसम जातीचे झाड अज्ञात व्यक्तींनी बुंध्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून तोडून टाकले. याप्रकरणी श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे सहसचिव शंकर रंगनाथ भामेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात न आला आहे.

जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात उष्णतेची लाट आली असून अवैध वृक्षतोडीमुळे यात भर पडत आहे. जळगाव संपूर्ण देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंदविल्या गेले आहे. सध्या पहूर परिसरातही ४५ डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान असून अशाप्रकारे वृक्षतोड करणाऱ्या नराधमांचा वृक्षप्रेमींकडून निषेध व्यक्त होत आहे

Related Articles

Back to top button