धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार जबरदस्तीने अत्याचार, पीडित मुलगी गर्भवती

मे 10, 2023 5:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या थांबत नाहीय. अशातच अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत आरोपीविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 3 1 jpg webp

नेमकी काय आहे घटना
पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून आरोपी रियाज अजित तडवी रा. ताडजिन्सी ता. रावेर हल्ली मुक्काम भवानी नांगर साखर कारखान्याजवळ बारामती याने पीडितांच्या बारामतीजवळील झोपडीत एकटी असताना दिनांक १४ जून २०२२ ते २५ ऑगस्ट २०२२ दम्यान वारंवार जबरदस्तीने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची फिर्याद पीडितांच्या आईने केल्यावरून रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनावणे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now