Bhusawal : लग्नाचे आमिष देऊन ठेवले जबरदस्तीने शारीरीक संबंध, 14 वर्षीय मुलगी गर्भवती

मे 4, 2023 11:16 AM

जळगाव लाईव्ह । ४ मे २०२३ । मुलींना लग्नाचे आश्वसन देऊन त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणत वाढल्या आहे. अशातच भुसावळातील एका १४ अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पीडित मुलगी चार महीन्याची गर्भवती झाली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात एका २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 4 jpg webp

या संदर्भात अधिक असे की, जानेवारी महिन्यात चार महिन्याआधी इमरान मुख्तार सैय्यद (वय २२) याने सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या मामाच्या घरात पिडीतेस इशाऱ्याने बोलून घेतले. यावेळी त्याने पिडीतेस ‘मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे, असे सांगून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

तसेच पिडीत मुलीसोबत सेल्फी फोटो काढून इन्टाग्रामवर स्टोरी ठेवली. यानंतर आता पिडीता चार महीन्याची गर्भवती आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि प्रकाश वानखडे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now