⁠ 
सोमवार, मे 6, 2024

मोठी बातमी ! अमित शाह यांच्याविरोधात एफ.आय.आर दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ ।  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला, डॉ. परमेश्वर आणि डी. के. शिवकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा तसेच भाजपच्या मेळाव्याच्या आयोजकांविरोधात बेंगळुरूच्या हायग्राऊंड्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. प्रक्षोभक विधाने, द्वेष पसरविणे आणि विरोधकांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेस सत्तेत आल्यास कर्नाटकमध्ये दंगली उसळतील असं वादग्रस्त विधान अमित शहा यांनी केल होत. शाह यांच्या दंगलीबाबतच्या याच विधानाच दाखला देत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला आणि डॉ. परमेश्वर यांनी भाजप नेते अमित शहा तसेच भाजपच्या मेळाव्याच्या आयोजकांविरोधात बेंगळुरूच्या हायग्राऊंड्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

प्रक्षोभक विधाने, द्वेष पसरविणे आणि विरोधकांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. एखाद्या सामान्य माणसाने असे केले असते तर त्याला अटक झाली असती. काँग्रेस सत्तेत आल्यास जातीय दंगली होतील हे केंद्रीय गृहमंत्री सांगू शकत नाहीत. ते गृहमंत्री आहेत, भाजपचे स्टार प्रचारक नाहीत. असे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले.


अमित शहा यांचे विधान
काँग्रेसचे सरकार आल्यास कर्नाटकचे भवितव्य रिव्हर्स गियरने पाठिमागे जाईल. चुकूनही काँग्रेस आली तर आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार, तुष्टीकरण, परिवारवाद निर्माण होईळ. तसेच संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील. ही पिढी परिवर्तनाची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन करू, असंही शाह म्हणाले होते.