⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

ग्राहकांना फुटला घाम ! एकाच दिवसात चांदी 1500 रुपयांनी महागली, सोनेही वधारले

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२३ । गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत होता. मागील दोन दिवस स्थिर असलेल्या चांदीच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे.त्यामुळे चांदीचा दर ७२ हजारांवर गेला आहे. याच सोबतच आज सोने देखील वधारले आहे. त्यामुळे सोन्याचा दर देखील ६० हजाराच्या उंबरवठ्यावर आला आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीत आणखी वाढ होणार आहे. Gold Silver Rate Today

आजचा सोन्याचा भाव Gold Rate
जळगाव सुर्वण नगरीत आज शुक्रवारी सकाळी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,८०० रुपये इतका आहे. यापूर्वी काल गुरुवार सकाळी सोन्याचा दर ५९,४५० रुपये प्रति तोळा इतका होता. म्हणजेच त्यात ३५० रुपयाची वाढ झालेली आहे. दोन दिवसात सोन्याच्या किमतीत ४०० रुपयाची वाढ झाली आहे.

या आठवड्याच्या पहिल्याच म्हणजेच सोमवारी (२७मार्च) सकाळी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ५९,४०० तर मंगळवारी ५९,२००, बुधवारी ५९,४००, गुरुवारी ५९,४५० असा होता.

मात्र यंदाच्या दिवाळीत सोन्याचा दर ६५,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर चांदीची किंमतही ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

आजचा चांदीचा भाव
दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत जोरदार वाढ झालेली दिसून येत आहे. आज सकाळी चांदीचा दर ७२,००० रुपये प्रति किलो इतका आहे. यापूर्वी काल गुरुवारी सकाळी चांदीचा दर ७०,५०० रुपये प्रति किलोने विकली जात होती. त्यात काही तासात तब्बल १५०० हजार रुपयाची वाढ झाली आहे. दरम्यान, यापूर्वी २ फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव ७४,००० रुपयावर गेला होता. अजून हा रेकॉर्ड मोडायचा आहे.
(वरील सोने आणि चांदीचे दर GST सह इतर कर वगळून आहेत)