⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | दुर्दवी : जळगाव शहरातील ‘हे’ नागरिक पित आहेत गटारीचे पाणी

दुर्दवी : जळगाव शहरातील ‘हे’ नागरिक पित आहेत गटारीचे पाणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । एका बाजूला जळगाव शहराचा विकास होत आहे. आम्ही शहराचा विकास करून दखवीला आहे, यावरून शहरात शिवसेना आणि भाजप मध्ये चढाओढ सुरु आहे. मात्र शहराचा अविभाज्य भाग असलेल्या हरी विठ्ठल नगर परिसरातील राजीव गांधी नगरमध्ये मात्र नागरिकांना गटारीचे पाणी प्यावं लागत आहे.

हरी विठ्ठल नगर मध्ये गटारिंची आणि रस्त्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून झाले नाहीयेत. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिक कित्येकदा महानगरपालिकेच्या खेटा मारत आहेत. महापौर जयश्री महाजन यांना कित्येकदा याबाबत निवेदन देण्यात आले आहे. मात्र नागरिकांना हव्या असलेल्या गटारी मिळत नाहीत. यातच विशेष बाब म्हणजे तिथले शाखाप्रमुख राधे बाबा जे शिवसेनेच्या पक्षातले आहेत म्हणजेच सत्ताधारी पक्षातले आहेत. तरीही सत्ताधारी पक्षातल्या एका शाखाध्यक्षाचे काम जळगाव शहरात होत नाही.

रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोणतेही स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महानगरपालिकेमध्ये आमच्या परिसरामध्ये स्ट्रीट लाईट लावा असे कित्येकदा निवेदन देऊनही परिसरात स्ट्रीट लाईट लागत नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्ट्रीट लाईट शिवाय जगण्याची आणि खराब रस्त्याची आम्हाला सवय झाली आहे. मात्र आम्हाला प्यायला मिळत असलेले पाणी हे गटारीचे आहे. गटार आणि पिण्याचे पाणी एकाच ठिकाणी जमा होत असल्याने नागरिकांना गटारीचे पाणी प्यावे लागत आहे. मोठ्या प्रमाणावर लहान मुलं आजारी पडली असून जवळजवळ दोन ते तीन जणांचा यामुळे जीव गेला आहे. असे ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना शिवसेना शाखाप्रमुख राधे बाबा म्हणाले

जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर या शिवसेनेच्या आहेत. या अनुषंगाने त्यांना निवेदन दिले आहे. मात्र आमच्या प्रभागाचा आणि आमच्या परिसराचा विकास करायला त्या पुढे येत नाहीत. आम्हाला साध्या गटारी मिळत नाहीत. याचबरोबर स्थानिक नगरसेवक ही आमच्याकडे काना डोळा करत असल्यामुळे आमच्या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह