‘पिण्या’ची तलवारीच्या धाकावर दहशत ; पोलिसांनी केली अटक
जळगाव लाईव्ह न्यूज : १६ मार्च २०२३ : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण करून शहरात दाखल झालेल्या गुन्हेगाराकडून तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण केली जात असल्याची माहिती जळगावच्या एमआयडीसी पोलिसांना कळताच त्यांनी धाव घेत सुप्रीम कॉलनी परीसरातून दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (22, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यास अटक केली. संशयीताविरोधात मंगळवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परीसरातील रामदेव बाबा मंदिर परीसरात हद्दपार संशयित दिनकर चव्हाण हा हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्यांना मिळताच पथकाने सायंकाळी 6.30 वाजता धाव घेत संशयित आरोपी दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण याला अटक केली. त्याच्याकडून तलवार पोलिसांनी हस्तगत केली करीत गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, नाना तायडे यांनी केली आहे. य तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहेत.