जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला असून तसे विधान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान, काल जाहीर केल्याप्रमाणे केवळ 45 वर्षाच्या वरील नागरिकांनाच लसीकरणाचा लाभ मिळणार असून 18 ते 44 या वयोगटातील कोविड लसीकरण तुर्तास थांबवण्यात आल्याचे देखील टोपे यांनी म्हटले आहे.
लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकऱण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात य़ेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करु नये असंही त्यांनी सांगितलं. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की २० तारखेनंतर सिरमक़डून लसींचे अधिक डोस उपलब्ध होणार आहेत त्यामुळे त्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहेत.