तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरची भांडी घासावीत – रामदास कदम
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२३ । उद्धवजी, मी केशवराव भोसले यांचा ड्रायव्हर होतो, हे तुम्ही सिद्ध केले तर तुमच्या घरी मी भांडी घासेन. नाही तर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासावित असा शाब्दिक हल्ला शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच खेडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी रामदास कदम आणि शिंदेगटवर शब्त्तीक हल्ला केला. यावर उत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
रामदास कदम म्हणले कि, उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा जो दौरा केला होता, त्या दौऱ्याची सर्व व्यवस्था मी केली होती. सगळी व्यवस्था म्हणजे तुम्हाला कळलं असेल. खासदार संजय राऊत त्याचे साक्षीदार आहेत. आदल्या दिवशी मला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि सांगितलं की, तुम्ही माझ्यासोबत अयोध्येला यायचं नाही.
याच बरोबर मी केशवराव भोसले यांचा ड्रायव्हर होतो, अशी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. उद्धवजी, मी केशवराव भोसले यांचा ड्रायव्हर होतो, हे तुम्ही सिद्ध केले, तर तुमच्या घरी मी भांडी घासेन. नाही तर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला यायल का? असेही कदम म्हणाले.