जळगाव लाईव्ह न्यूज | २१ फेब्रुवारी २०२३ | जिल्ह्यात कापूसटंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी बाजारात कापूस आणत नसल्याचे चित्र आहे.यामुळे जिनिंग मिल संकटात सापडल्या आहेत.
कापसाला मागील वर्षी जवळजवळ १४ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला होता. तोच विक्रमी भाव यंदाही मिळेल अशी अशा शेतकरी करत आहेत. यामुळे ते बाजारात कापूस आणत नाहीयेत.यामुळे जिनिंग मिल संकटात सापडल्या आहेत.
अधिक धक्कादायक माहिती अशी कि, जिल्ह्यातील दीडशेपैकी केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू होत्या. आताच्या घडीला त्यातील ५० जिनिंग बंद झाल्या आहेत. तर तर २५ जिनिंग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यंदा कापसाचे उत्पादन जास्त असले, तरी ८५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.
मात्र यामुळे कापसाच्या वजनात घट होऊ लागली आहे. याचबरोबर कापसाचा दर्जाही खालवला आहे. यामळे शेतकरी चिंतीत आहेत