⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | झाड तोडायचा विचार करताय? सावधान तुम्हाला होणार तब्बल ‘इतका’ दंड

झाड तोडायचा विचार करताय? सावधान तुम्हाला होणार तब्बल ‘इतका’ दंड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ फेब्रुवारी २०२३ |  जळगाव शहरात विनापरवानगी वृक्षतोडीचे प्रकार सर्रास सुरू आहेत.मात्र तुम्ही झाड तोडताना पकडले गेलात किव्वा कोणी अशी रीतसर तक्रार केली तर तुम्हाला १० हजारांचा दंड बसू शकतो. याच बरोबर फांदी तोडल्यास ५ हजारांचा दंड केला जाऊ शकतो.

याचबरोबर दंडाची रक्कम न भरल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. याशिवाय एक वृक्ष तोडण्याची परवानगी घेतली असल्यास त्या वृक्षाच्या बदल्यात ५ वृक्ष लावणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी १५०० रुपये डिपॉझिट आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाच्या नियमानुसार अनधिकृतपणे किंवा विना परवानगीने वृक्षतोड केल्यास दहा हजारांचा दंड व फांद्या तोडल्यास पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची सर्व शाखा अभियंता यांनी अंमलबजावणी करण्याचे आदेश शहर अभियंत्यांकडून देण्यात आलेले आहेत.

विनापरवानगी वृक्षतोड केल्यास संबंधित व्यक्ती, मालक, भोगवटाधारक पालिकेकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटिसीद्वारे संबंधितांनी दंडाची रक्कम पालिकेत जमा करावी असे कळवले जाणार आहे; परंतु दंडाची रक्कम अदा न केल्यास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले

author avatar
टीम जळगाव लाईव्ह