जळगाव जिल्हाजळगाव शहरमहाराष्ट्र

१०० टक्के दंड माफ करणारी जळगाव मनपा ठरली पहिली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। १० फेब्रुवारी २०२३ । जळगाव महापालिकेची शहरातील मालमत्ताधारकांकडे मोठ्याप्रमाणात थकबाकी असून अनेक मालमत्ता धारकांवर गेल्या सहा वर्षापासून घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल व्हावी या उद्देशाने मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी १०० टक्के शास्ती (दंड) माफीची अभय योजना जाहीर केली आहे. अशा स्वरुपाची शास्ती माफ करणारी जळगाव महापालिका ही राज्यातील पहिली मनपा आहे.

शहरातील मालमत्ताधारकांकडे १७९ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच चालू वर्षीचा देखील ५० कोटीहून अधिक कर अद्याप नागरिकांनी भरलेला नाही, त्यामुळे शहरातील नागरिकांना सेवा सुविधा पुरविण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मालमत्ताधारकांना अभय योजना जाहीर करून थकबाकी वसुल करण्यासाठी डॉ. विद्या गायकवाड यांनी शास्ती माफीचा निर्णय घेतला असून दि.६ फेब्रुवारी ते दि.१५ मार्च पर्यंत ही अभय योजना लागू आहे. या कालावधीत मालमत्ता कराची थकबाकी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना संपुर्ण दंड माफ केला जाणार आहे. आतापर्यंत राज्यातील एकही महापालिकेने आतापर्यंत पुर्ण शंभर टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतलेला नाही त्यामुळे जळगाव महापालिकेचा हा निर्णय ऐतिहासीक ठरणार आहे. म्हणून मालमत्ताधारकांनी आपल्यावरील थकबाकी भरून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ऑनलाईन सुविधा उपलब्ध

मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेने गुगल पे, फोन पे, नेट बँकींग, वेबसाईड व क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. नागरिकांना वाटप करण्यात आलेल्या बिलांवर क्यूआर कोड देण्यात आला असून हा कोड क्यूआर कोडच्या ॲपमधून स्कॅन केल्यास संबधित मालमत्ताधारकांवरील थकबाकीची रक्कम, नाव दर्शवितो. त्यात पे ऑपश्नवर क्लिक करुन कर भरता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सहा वर्षात १७९ कोटींची थकबाकी

शहरातील ११ हजार १७० नागरिकांनी सहा वर्षापासून मालमत्ता कर व पाणी पट्टी भरली नसल्यामुळे त्यांच्यावर ५७ कोटी ३६ लाखांची थकबाकी आहे. २ हजार ३३२ मालमत्ताधारकांनी पाच वर्षापासून कर भरला नसल्यामुळे २५ कोटी ३३ लाखांची थकबाकी आहे. चार वर्षापासून ५ हजार ४६० मालमत्ताधारकांकडे ९ कोटी ५९ लाखांची थकबाकी आहे. तीन वर्षापासून ५ हजार ५७० मालमत्ताधारकांकडे ९ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. दोन वर्षापासून १८ हजार ६१२ मालमत्ताधारकांकडे २६ कोटी ४६ लाखांचा कर थकीत आहे. तर, मागील वर्षी ६९ हजार ६६९ मालमत्ता धारकांनी २४ कोटी ९८ लाखांचा कर भरणार केलेला नाही, त्यामुळे सहा वर्षांत एकुण १७९ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी मालमत्ताधारकांकडे थकीत आहे.

Related Articles

Back to top button