जळगाव लाईव्ह न्यूज : १० फेब्रुवारी २०२३ : दुसऱ्यांना जळगाव शहराच्या आयुक्त झाल्यावर डॉ. विद्या गायकवाड या पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. नियुक्ती होऊन सात दिवस पूर्ण होत नाही तेच त्यांनी जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का दिला. यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी स्वतः मनपा कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शुक्रवारी स्वतः जळगाव शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यावेळी डॉ. विद्या गायकवाड यांनी उशिरा आलेल्या लेट लतीफ कर्मचाऱ्यांची झाडा झडती घेतली व पुन्हा उशिरा न येण्याचा सूचना वजा इशारा दिला.
आयुक्त विद्या गायकवाड या स्वतः वेळेच्या आधी महापालिकेत हजर झाल्या. त्यानंतर उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांची त्यांनी झाडाझती घेतली व पुन्हा उशिरा झाल्यास कारवाईचा इशारा देखील दिला. यावेळी दहा ते पंधरा कर्मचारी उशिरा आले होते.
पुन्हा उशीर झाल्यास कारवाई
उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा उशीर झाल्यास कारवाई करण्यात येईल असा सूचना देण्यात आल्या. याचबरोबर पहिल्यांदा चूक झाली म्हणून माफ करण्यात येत आहे असेही सांगण्यात आले.
पंधरा कर्मचारी लेट
डॉ.विद्या गायकवाड या महानगरपालिकेच्या प्रवेश द्वारावर उभ्या असताना कर्मचारी उशिरा येत असल्याचे त्यांना निदर्शनास आले. यावेळी जवळजवळ 15 कर्मचारी उशिरा आले होते.