मोठी बातमी ! RBI कडून पुन्हा एकदा रेपो दरात वाढ

फेब्रुवारी 8, 2023 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२३ । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नवीन वर्षात पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करून करोडो देशवासीयांना धक्का दिला आहे. केंद्रीय बँकेने पतधोरणात बदल करताना व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी RBI च्या आर्थिक पुनरावलोकन धोरणानंतर रेपो दरात हा बदल जाहीर केला आहे. रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्सच्या वाढीनंतर तो 6.50 टक्के झाला आहे. यापूर्वी रेपो दर ६.२५ टक्के होता. तत्पूर्वी, तीन दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक आढावा धोरणाची बैठक आज संपली.

Rbi Bharti 2022

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, गेल्या सुमारे तीन वर्षांत विविध आव्हानांमुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांसमोर चलनविषयक धोरण पातळीवर आव्हान निर्माण झाले आहे. यापूर्वी 7 डिसेंबर रोजी आरबीआयकडून रेपो दरात 35 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली होती. रेपो दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम बँकांकडून ग्राहकांना दिलेल्या कर्जाच्या व्याजदरावर होणार आहे. यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now