⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२३ । पाचोरा निर्मल इंटरनॅशनल स्कूल च्या प्रांगणात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रथमतः सकाळी 7.40 मिनिटांनी निर्मल सीड्‌सचे संचालक डॉ. एस. एस. पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी शाळेचे प्राचार्य गणेश राजपूत यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले.

इ 7 वी. च्या विद्यार्थ्यांनी सौ लक्ष्मी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पथसंचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूहनृत्य व समूहगीताने सर्वांची मने जिंकली. यावेळी शैक्षणिक वर्षात संपन्न झालेल्या निर्मल उत्सव मधील सूत्रसंचालन व समूह नृत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कु. मीनल परमेश्वर पाटील (इ. 10 वी) हिला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी कु. देवांश पाटील व मुख्य विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. श्रेया पाटील यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी शाळेचे सचिव नरेंद्रसिग सुर्यवंशी, संस्थेच्या उपाध्यक्षा कमलताई पाटील, प्राचार्य गणेश राजपूत उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, सीबीएसई समन्वयक सौ स्नेहल पाटील तथा पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.