जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । गेल्या दोन महिन्यांपासून धुक्यामुळे परप्रांतातून येणाऱ्या रेल्वेगाड्या अद्यापही विलंबाने धावत आहेत. शनिवारी रात्री जळगावहून मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या शालिमार एक्सप्रेस हावडा एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस व सचखंड एक्सप्रेस या गाड्या ७ ते ८ तास विलंबाने धावल्या. रात्रीच्या गाड्या विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांना दुपारच्या व सायंकाळच्या सत्रातील गाड्यांनी प्रवास करावा लागत आहे.
दरवर्षी धुक्यामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व दिल्ली या ठिकाणावरून येणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडा५ ते ५ तासांपर्यंत विलंबाने धावतात. मात्र, यंदा थंडीमुळे लोको पायलटला परप्रांतामध्ये धुक्याचे प्रमाण अधिकच असल्याने सिग्नल यंत्रणा व्यवस्थित दिसत नाही.
गेल्या दोन महिन्यांपासून धुक्यामुळे जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या ७ ते ८ तासांपर्यंत विलंबाने धावत आहेत. यामध्ये शालिमार, हावडा व आझाद हिंद एक्सप्रेस या गाड्यांची जळगाव स्टेशनवर येण्याची रात्रीची वेळ नऊ ते साडेदहादरम्यान आहे. मात्र, या गाड्या विलंबाने धावत असल्याने पहाटे ४ ते ६ च्या दरम्यान जळगावात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना गाडीची वाट पाहत स्टेशनवरच थांबावे लागत आहे.
रात्रीच्या सत्रातील जळगावहून मुंबई, पुण्याकडे जाणाया बहुतांश गाड्या विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आता रात्रीच्या गाड्यांऐवजी दुपारच्या व सायंकाळच्या गाड्यांनी प्रवास करण्याला प्राधान्य दिले आहे. दुपारच्या सत्रातील काशी, कामायनी कुशीनगर, अमृतसर, गोरखपूर सुपरफास्ट आदी गाड्यांनी प्रवास करत असल्यामुळे या गाड्यांना गर्दी वाढली आहे.पर्यायी नागरीकांचे हाल होत आहेत.