महाराष्ट्रराजकारण

फडणवीसांच्या पेन ड्राईव्हवरून चाळीसगावमध्ये होणार कारवाई!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ जानेवारी २०२३ | संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात मोठी चर्चा घडवून आणलेल्या बीएचआर घोटाळ्याचे संशयित सुनील झंवर याच्या जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देत एक कोटी २२ लाखांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या विषयी तत्कालीन विरोधीपक्ष नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत पेन ड्राईव्ह सादर केला होता. आणि याच पेनड्राइव्हनुसार त्यावर आता चाळीसगाव पोलिस कारवाई करणार आहे.

तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण लेखापरीक्षक शेखर सोनाळकर आणि मद्यव्यवसायिक उदय पवार यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याचे घटनास्थळ चाळीसगाव असल्याने गुन्हा चाळीसगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल १ कोटी २२ लाख खंडणीच्या गुन्ह्यांचा सर्व घटना या जळगाव जिल्ह्यात घडलेल्या आहेत. परिणामी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी तो शून्य क्रमांकाने जळगाव पोलिसांकडे हस्तांतरित केला आहे.

Related Articles

Back to top button