Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे नाराज नाहीत , त्यांच्याशी संपर्क झाला आहे – संजय राऊत

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । शिवसेनेत आईचे दूध विकणारी औलाद नाही. एकनाथ शिंदे नाराज नाही.त्यांच्याशी संपर्क झाला आहे. अशो प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते मुंबई मध्ये पत्रकारांशी बोलत होते. विधानपरिषद निवडणूक आटोपताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे (Eknath Shinde ShivSena) यांच्यासह २५ आमदार आणि ५ मंत्री फुटल्याचा बातम्या समोर येत आहेत. याबाबाद ते बोलत होते.

sanjay raut

एकीकडे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला झटका बसला असताना भाजपने पुन्हा त्यांची झोप उडवली आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, आमदारांचा एक मोठा गट नॉट रिचेबल झाला असून सुरत येथील ली मेरिडियन हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. एकनाथ शिंदे दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता असून त्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : Eknath Shinde Updates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गुलाबराव पाटील यांच्यात बैठक सुरु

राज्यसभा निवडणूक व विधानपरिषद निवडणूकमध्ये लागोपाठ दोन वेळा धोबीपछाड मिळालेल्या महाविकासआघाडीला अजून मोठा एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे प्रती मुख्यमंत्री म्हटले जाणारे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ११ आमदारांसह नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता आता अजून वाढली असून आता शिवसेना पुनः एकदा फुटते आणि सरकार कोसळते की काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

ना.एकनाथ शिंदे समर्थक समजले जाणारे जळगावातील एक आमदार देखील नॉट रीचेबल म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांचा एक मोठा गट असून त्यांच्या मुळेच शिवसेनाचा पाया मजबूत असल्याचे नेहमी म्हटले जाते. काल पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची अतिरिक्त मते मिळवत भाजपने आपला इरादा काय आहे ते स्पष्ट केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now