भरधाव दुचाकी पुलाच्या भिंतीवर आदळल्याने दोन मित्रांचा मृत्यू

जानेवारी 17, 2023 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येतेय. भरधाव वेगाने येणारी दुचाकी पुलाच्या भिंतीवर आदळल्याने दोन मित्रांचा करुण अंत झाला आहे. सुरज रामदास तांबे (वय-१५, रा. काहुरखेडा ता. भुसावळ) आणि सुनिल विठ्ठल भालेराव (वय-२०, रा. वघारी ता. जामनेर) अशी या दोन तरुणांची नावे असून ही घटना भुसावळ तालुक्यातील महामार्गावरील कोहूरखेडा फाट्याजवळ घडलीय. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

kohurkheda fata accident jpg webp

नेमकी काय आहे घटना?

सुरज तांबे आणि सुनिल भालेराव हे दोघे मित्र सोमवारी १६ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १९ डी १६००) ने भुसावळ तालुक्यातील काहुरखेडा फाट्याजवळून भरधाव दुचाकीने जात होते. त्यावेळी स्पीडब्रेकरवरून वाहन आदळल्याने दुचाकीस्वार सुनिल भालेराव याचे दुचाकीवरील ताबा सुटल्यानंतर भरधाव दुचाकी थेट नजीकच्या पुलावरील भिंतीवर आदळली.

या अपघातात सुरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सुनिल भालेराव याला उपचारासाठी नेत असतांना त्यांचाही जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत बोहार्डीचे पोलीस पाटील साहेबराव शांताराम पाटील यांच्या खबरीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय बाविस्कर करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now