⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | महाराष्ट्रातील युवकांसाठी खुशखबर! महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची मेगाभरती

महाराष्ट्रातील युवकांसाठी खुशखबर! महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची मेगाभरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२३ । राज्यातील बेरोजगार युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे की,राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणिपंचायतींमध्ये ५५ हजारांहून अधिकरिक्त पदे आहेत. त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनामुख्यमंत्री शिंदे यांनीदिल्या आहेत.

राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदे संचालनालयामार्फत आणि नगर पंचायत स्तरावरील संवर्गता गट क आणि गट ड मध्ये ३७२० पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती तर्फे करण्यात येत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.