जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । संरक्षण मंत्रालय यांची कंपनी Yantra India Limited मध्ये दहावी पास तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. Yantra India Limited ने 5450 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अप्रेंटिसशि पदांसाठी ही भरती होणार असून ज्या तरुणांनी आयटीआय केलेले नाही तेही शिकाऊ नोकरीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अधिसूचनेनुसार, अर्जाची प्रक्रिया जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात सुरू होईल. Yantra India Limited Bharti 2023
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) आयटीआय / Non- ITI 1936
शैक्षणिक पात्रता : 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य
2) आयटीआय / Ex- ITI 3514
शैक्षणिक पात्रता : NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य)
वयोमर्यादा- आयटीआय आणि नॉन आयटीआय श्रेणीतील अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांचे वय किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.
अर्ज कसा करायचा
उमेदवारांना प्रथम https://www.apprenticeship.gov.in/ वर जाऊन नोंदणी करावी लागेल. यानंतर, यंत्र इंडिया लिमिटेडच्या https://www.yantraindia.co.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. तुम्ही अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पोर्टलवर आधीच नोंदणी केली असेल, तर फक्त Yantra India वेबसाइटला भेट देऊन अर्ज करा.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा