⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

अमळनेरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून बजाज फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड ; कारण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२३ । एकीकडे राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना जळगावमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. यावेळी कार्यालयातील कर्मचारी भीतीने पळून गेल्याचीही माहिती आहे. ही घटना अमळनेर तालुक्यात मंगळवारी (10 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली.

नेमकं प्रकरण काय?

तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी घेतलेल्या पर्सनल लोनचा एक हफ्ता थकल्याने बजाज फायनान्सचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, पत्नी एकटी घरी असताना वसूली कर्मचार्‍यांनी दादागिरी केली. वसुलीसाठी बजाज कंपनीच्या कर्मचार्‍यांची दादागिरी बाबत अनेक शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या होत्या. यामुळे शिंदे गटाचे संतप्त पदाधिकार्‍यांनी मंगळवार १० रोजी सायंकाळी अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील बजाज फायनान्स कार्यालयाची तोडफोड केली.

या घटनेने फायनान्स कंपनी कार्यालयातील कर्मचारी घाबरून पळून गेले. कार्यालयातील खुर्च्या, टेबल, संगणक यांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.