जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

हिंदूंनो, यापुढे खान्देश नव्हे, तर ‘कान्हादेश’ म्हणा ! – सुरेश चव्हाणके

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । २६ डिसेंबर २०२२ । यापुढे खान्देश नव्हे, तर ‘कान्हादेश’ म्हणायला हवे. जळगाव भागात मोठ्या प्रमाणात वाढलेली गोतस्करी, गोहत्या आणि गोरक्षकांवरील आक्रमण रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षमपणे कधी लक्ष देईल ? छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या भूमीमध्ये क्रूरकर्मा टिपू सुलतान आणि औरंगजेब यांचे उदात्तीकरण का केले जात आहे ? त्यांचे उदात्तीकरण न करता छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास आणि स्वाभिमान समोर ठेऊन जीवन जगा. भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणार्‍या अभिनेत्याच्या ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घाला, असे आवाहन ‘सुदर्शन न्युज’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. 25 डिसेंबर या दिवशी येथील शिवतीर्थ मैदान येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनीही उपस्थित हिंदूंना संबोधित केले. हिंदु राष्ट्र जागृती सभेला सहस्रो हिंदूंनी उपस्थिती दर्शवून ‘अब, जो हिंदू हितकी बात करेगा, जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा !’ असा निर्धार केला. ज्या सभेची जळगावकर आतुरतेने वाट पहात होते त्या सभेला हिंदूंनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदु राष्ट्र स्थापेनच्या कार्यात तन, मन, धनाने समर्पित होण्याचा निर्धार केला. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदू हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी श्री. अमोल वानखेडे यांनी केलेल्या शंखनादानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. येथील वेदमूर्ती पुरुषोत्तम शुक्ल, भूषण मुळे, श्रीराम जोशी, प्रवीण जोशी, महेश जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते सनातन प्रकाशित ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

धर्मावरील आघात रोखण्यासाठी आतापासून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला आरंभ करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पुरोगामी आणि धर्मांध संघटनांच्या विरोधानंतर पद, पक्ष, संघटना, संप्रदाय सर्व बाजूला ठेऊन हिंदु राष्ट्र जागृती सभेला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदूंच्या संघटित शक्तीचा जळगाव पॅटर्न तयार झाला आहे. देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावर झाली आहे. मुसलमानांसाठी पाकिस्तान दिला, तर उर्वरित राष्ट्र हे ‘हिंदु राष्ट्र’ का नाही ? या देशाला इस्लामी राष्ट्र, खलिस्तानी राष्ट्र, ख्रिस्ती आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र होऊ द्यायचे नसल्यास आतापासून हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास आरंभ करा. सध्या अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण चालू आहे. जळगाव जिल्ह्यातील सावदा, फैजपूर, यावल या परिसरामध्ये सर्रासपणे गोतस्करी, गोहत्या होत आहेत. जळगावमध्ये अवैधपणे पशूवधगृहे चालू आहेत. गोहत्यारे मोकाट आहेत आणि गोरक्षकांवर हल्ले होत आहेत. हे सर्व थांबवायचे असल्यास गावागावांत याविषयी आंदोलने व्हायला हवीत. वक्फ बोर्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा, नाशिक जिल्ह्यातील निफाड यांसह अनेक ठिकाणी वक्फ बोर्डने जमिनींवर दावा लावला आहे. यामाध्यमातून लॅण्ड जिहादच चालू आहे. हे सर्व थांबवण्यासाठी वक्फ ॲक्ट रहित करणे आणि वक्फ बोर्ड रहित करणे यासाठी जळगाववासीयांनी विरोध करायला हवा. 

धर्मशिक्षण घेतल्यास स्त्रिया सर्वदृष्ट्या सुरक्षित होतील ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
पुढारलेपणाच्या नावाखाली आपण महान हिंदु धर्मापासून दूर चाललो आहोत. विदेशामध्ये हिंदु धर्म, योग, आयुर्वेद यांविषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण होत आहे. भारतीय स्वत:ची वेशभूषा, केशभूषा, आहार, संस्कृती, परंपरा विसरत चाललो आहोत. धर्मपालन करणे आज हिंदूंना हास्यास्पद वाटत आहे. कपाळावर कुंकू लावण्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. यामागील धर्मशास्त्र समजून घेतल्यास ‘कुंकू लावणे’ हा मागासलेपणा वाटणार नाही. धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केल्यास स्त्रिया सर्वदृष्ट्या सुरक्षित होऊ शकतात.

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा
श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करणारा आफताब, झारखंड येथील रिबिका पहाडीन हीचे इलेक्ट्िरक कटरने ५० तुकडे करणारा दिलदार अन्सारी, बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून रुपाली चंदनशिवे हिचा भर रस्त्यात गळा चिरणारा इकबाल मोहम्मद, इस्लाम स्वीकारण्यास नकार देणार्‍या निधीला ४ थ्या माळ्यावरून खाली फेकून देणारा सुफियान हे सर्व एकाच जमातीचे लव्ह जिहादी आहेत. हिंदू मुलगी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्यास तिचे बळजोरीने धर्मांतर केले जाते, तिचा वापर केवळ शारीरिक उपभोगासाठी केला जातो, गोमांस सेवनाची, नमाज पडण्याची सक्ती केली जाते, वेश्या व्यवसायात ढकलले जाते किंवा आतंकवादी कारवाया करण्यासाठी वापर केला जातो. हे ‘जिहादी संकट’ रोखण्यासाठी हिंदु मुलींनी धर्माचरण करणे आवश्यक आहे.

Related Articles

Back to top button