जळगाव जिल्ह्यासाठी मिळणार पाच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर

मे 6, 2021 7:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । कोविड रूग्णांसाठी ऑक्सीजनची मागणी वाढत असतांना जळगाव जिल्ह्यासाठी पाच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरणे मिळणार असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. याचा जळगाव जिल्ह्यातील रूग्णांना लाभ होणार आहे.

gulabrao patil

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून ऑक्सीजनचा साठा उपलब्ध केला असला तरी दररोज याची मागणी वाढतच आहे. या पार्श्‍वभूमीवर, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे उपाययोजनांची मागणी केली होती. याअनुषंगाने ना. टोपे यांनी ना. गुलाबराव पाटील यांना पत्र पाठवून जळगाव जिल्ह्यासाठी पाच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरणांची तरतूद करण्यात आल्याचे कळविले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, ऑक्सीजनच्या वाढत्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मदतीची मागणी केली होती. या आवाहनाला सिंगापूर येथील टेमासेक फाऊंडेशनने प्रतिसाद देत तातडीने ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरणे उपलब्ध केली असून याचे राज्यात ठिकठिकाणी वाटप करण्यात येत आहे. यातून जळगाव जिल्ह्यासाठी पाच उपकरणे देण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. आरोग्य खात्याच्या माध्यमातून ही पाचही ऑक्सीजन उपकरणे जळगावचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्याच्या आरोग्य विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी दिलेल्या पाच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरणांचा तातडीने आवश्यकतेनुसार वापर करण्यात येणार आहे. या उपकरणांचा जिल्ह्यातील रूग्णांना लाभ होणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now