दूध संघ निवडणूक : महापौरांच्या सासूविरुद्ध पालकमंत्री सरळ लढत रंगणार!

नोव्हेंबर 28, 2022 9:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. महापौर जयश्री महाजन यांच्या सासू, विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या आई मालतीबाई सुपडू महाजन यांची थेट लढत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. जळगाव ग्रामीणमध्ये ही लढत चुरशीची ठरणार आहे.

1669650098778 jpg webp

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सर्वपक्षीय पॅनलची शक्यता संपुष्टात आली आहे. आज झालेल्या माघारीच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. जळगाव ग्रामीणमधून जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासू तथा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या आई मालतीबाई सुपडू महाजन यांनी थेट विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे.

माघारीनंतर दोन्ही अर्ज कायम असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध मालतीबाई सुपडू महाजन यांचा सामना रंगणार आहे. महापौर विरुद्ध पालकमंत्री यांच्यातील वाद गेल्या काही दिवसापासून वाढतच आहे. मनपासाठी विकास निधी देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. महापौर जयश्री महाजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या असून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बाळासाहेबांची शिवसेना गटातील आहेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now