धक्कादायक : बसमधून प्रवास करत घरी जात असलेल्या विद्यार्थीनींची छेड
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । शाळेतून सुटल्यानंतर बसमधून प्रवास करत घरी जात असलेल्या विद्यार्थीनींची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव ते आसोदा दरम्यान घडला आहे. विद्यार्थीनींची छेडखानी केल्याप्रकरणी असोदा येथील गावकऱ्यांकडून पब्लिक मार देण्यात आला. ही घटना गुरूवारी १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता असोदा गावात घडली. याप्रकरणी दोघांना जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील असोदा येथील आठवी ते दहावी शिकणाऱ्या विद्यार्थीनी ह्या बसने प्रवास करून जळगाव शहरात येतात. तर सायंकाळी पुन्हा बसने घरी जातात. मात्र, गेल्या महिन्याभरापासून दीपक पुंडलिक सपकाळे आणि मोहित बुधा सोनवणे हे दोन टवाळखोर विद्यार्थिनींच्या मागे लागून अश्लील शेरोशायरी करत होते. परंतू याकडे विद्यार्थीनी दुर्लक्ष केले. दरम्यान, गुरूवार १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आसोदा गावातील सर्व विद्यार्थीनी जळगाव नवीन बसस्थानकात येवून बसमध्ये बसल्या. त्यावेळी हे दोन्ही टवाळखोर देखील बसले. जळगाव आसोदा रस्त्यादरम्यान बसमध्ये विद्यार्थीनी प्रवास करत असतांना पुन्हा विद्यार्थीनीसोबत अश्लिल भाषेत शेरोशायरी करत छेडखाणी करण्यास सुरूवात केली. तुझे नाव काय, नंबर काय असे बोलून काही विद्यार्थीसोबत अश्लिल वर्तन केले. सायंकाळी घरी गेल्या यातील काही विद्यार्थीनींनी हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. हा प्रकार काही नागरिकांना कळाल्यानंतर त्यांनी दीपक, मोहित यांना शोधून चांगलाच चोप दिला. नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बी. पवार करीत आहे.
दीपक पुंडलिक सपकाळे आणि मोहित बुधा सोनवणे दोन्ही रा. आसोदा ता.जि.जळगाव असे संशयित आरोपीचे नावे आहे.