सोने-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच ; आज पुन्हा महागले

नोव्हेंबर 18, 2022 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. गुरुवारी भारतीय वायदा बाजारात सकाळच्या सत्रात दोन्ही धातूंच्या कितमीत घसरल्या होत्या. मात्र आज सकाळी सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या आहे. आज सोने किंचित 60 रुपयांनी महागले आहे. तर दुसरीकडे चांदी 264 रुपयानी वधारली आहे. सोन्याचा भाव पुन्हा 53 हजाराच्या उंबरवठ्यावर आला आहे. Gold Silver Rate Today

gold silver

आज शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 60 रुपयांनी वाढून 52,905 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. सोन्याचा भाव आज 52,843 रुपयांवर उघडला. उघडल्यानंतर, किंमत 52,855 रुपयांवर गेली. पण, नंतर वाढ झालेली दिसून आली. तर दुसरीकडे आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी 264 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 61,212 रुपयांवर व्यवहार करत आहे.

सोन्याचा दर आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा किती खाली आहे ते जाणून घ्या
सोने अजूनही 3,300 रुपये प्रति 10 ग्रॅमने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 53,000 रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा भाव 62 हजाराच्या वर आहे. दरम्यान, दिवाळीनंतर जळगाव सराफ बाजारात सोन्यासह चांदीचा दर पुन्हा वधारलेला दिसून येतोय.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.  

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now