संतापजनक! वृद्धाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नशिराबाद पोलिसांत गुन्हा

नोव्हेंबर 17, 2022 3:40 PM

Crime News-जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । डोळ्यात औषध टाकण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकणी नशिराबाद पोलिसांत वृद्धा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 18 jpg webp

सविस्तर असे की, परिसरातील एका गावात हेमराज भोजू चौधरी (वय ६०) याने एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस डोळ्यात औषध टाकण्याचे बहाणा करुन तिला घरी बोलावुन घेतले. यानंतर हेमराज चौधरी याने पिडीत मुलीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now