Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । चिनावल येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 14, 17 व 19 वर्षे वयोगटाच्या मुला मुलींच्या शासकीय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील शिक्षकेतर बंधू भगिनींचा शिक्षकेतर दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यानंतर रॉक बॉल फेडरेशनचे राष्ट्रीय पंच योगेश तडवी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका मिनल नेमाडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक पी एम जावळे, ज्येष्ठ शिक्षिका पुष्पा तायडे, जी बी निळे, डी आर नेहेते व दसनूर विद्यालयाच्या शोभा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटात अँग्लो उर्दू हायस्कूल रावेर येथील संघ, तर 17 व 19 वर्ष वयोगटात मुले व मुलींचा नूतन माध्यमिक विद्यालयाचा संघ अंतिम सामन्यात विजयी ठरले. त्यात 17 वर्षे वयोगटात मुले व मुली यांच्या अंतिम सामन्यात स्वामीनारायण गुरुकुल सावदा या शाळेचा पराभव केला.
सदर स्पर्धांना पंच म्हणून योगेश तडवी, दुष्यंत कोलते, यश चौधरी व भूषण भंगाळे यांनी काम पाहिले. तर स्पर्धा यशस्वीतेसाठी सीएस किरंगे,एल एम ठाकूर, नयना ठोंबरे,एम बी पाटील ,पी एस वारके, जी बी चोपडे, रोशन होले यांनी सहकार्य केले व सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख एम एस महाजन यांनी केले तर आभार एस एस नेहेते यांनी मानले.