⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | मोठा वाघोदा ग्रामपंचायतीतर्फे कब्रस्तानात नवीन कुपनलिका, भरमसाठ लागले पाणी

मोठा वाघोदा ग्रामपंचायतीतर्फे कब्रस्तानात नवीन कुपनलिका, भरमसाठ लागले पाणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । मोठा वाघोदा येथील रावेर रोडवरील कब्रस्तानात ग्रामपंचायत च्या १५वा वित्त निधीतून कुपनलिका (ट्युबवेल) ला भरमसाठ पाणी लागले असून हजरत पिर बालेशाह बाबा यांच्या दर्गा शेजारी पायथ्याशी भरपूर पाणी लागल्याने मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायत प्रशासनाने दफनभूमी साठी केलेल्या स्तुत्यपुर्ण उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

ग्रामपंचायतीचे सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी, उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी, ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी, योगिराज किसन महाजन, संजय काशिनाथ माळी, उदय प्रभाकर पाटील, भुषण बाळू चौधरी, अमोल वसंत वाघ, अमीनाबाई सुभान तडवी, सुमनबाई शंकर कापसे, हर्षा विशाल पाटील, मिनाक्षी हर्षल पाटील, संगिता स्वप्निल पवार, हाजराबी करीम पिंजारी, साधनाबाई निळकंठ महाजन, प्रमिला युवराज भालेराव, भाग्यश्री बाळू वाघ आदींनी परिश्रम घेतले.

वाघोदा वासियांतर्फे समाधान!
१५ वा वित्त आयोगाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता निधीतून कुपनलिका ट्युबवेल करण्याचे काम मासिक सभेत मंजूर केले व पुर्णत्वास ही आणलेबद्दल मोठा वाघोदा ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल मोठा वाघोदा वासियांतर्फे समाधान व्यक्त केले जात आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह